breaking-newsTOP Newsताज्या घडामोडी

महत्वाची बातमी! जून महिन्यात बदललेले ‘हे’ नियम

June Rule Change | आजपासून जून महिना चालू झाला आहे. या महिन्यात पहिल्याच दिवसापासून अनेक नियम बदलणार आहेत. हे नियम माहीत नसल्यास तुम्हाला आर्थिक फटका बसू शकतो. आतापासून ड्रायव्हिंग लायसन्ससाठी आरटीओ कार्यालयात जाण्याची गरज नाही. तुम्हाला एखाद्या खासगी ड्रायव्हिंग स्कूलमध्येही लायसन्स मिळणार आहे.

अल्पयवीन मुलगा-मुलगी वाहन चालवताना दिसल्यास त्याच्या पालकांकडून २५,००० रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. यासह अशा प्रकरणांत वाहन मालकाची नोंदणी रद्द केली जाईल.

हेही वाचा     –      जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदार संघात मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज; जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

आधारकार्ड मोफत अपडेट मुदत वाढवली असून ती १४ जूनपर्यंत असणार आहे. पण ई-सेवा केंद्रावर जाऊन तुम्हाला आधार कार्ड अपडेट करायचं असल्यास ५० रुपये फी द्यावी लागेल.

एक जूनपासून एलपीजी सिलिंडर स्वस्त झाला आहे. हा नवा दर आजपासूनच लागू झाला असून व्यावसायिक गॅस सिलिंडर स्वस्त झाला आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button